अवकाळी पावसाची सर
त्यासोबत थंडगार वाऱ्याचा जोर,
विजांचा खेळ आणि सुखद आठवणींची रेलचेल…
तसा पावसाळा मला आवडत नाही,
पण एप्रिलच्या कडक उन्हात त्याच्या आगमनावर शंकाच नाही,
कडक चहाचा कप, सोबत वडापावची पार्टनरशिप,
विचारांची रेलचेल आणि शरीर आपलं निपचिप…
कुठे होतो आपण, आता कुठे आहे,
थंड हवेचा झोत सांगून जातो चल माझ्यासंगे वाहे,
तू कोण मी कोण दोघांनाही घाई,
तुला तुझ्या ध्येयाची, मला शमवण्या लाही.
प्रश्न सर्वांचे सारखेच असतात उत्तरे ही तीच,
तरीही प्रत्येक जण विचारतो, देवा कारे मीच ?
देव म्हणतो,
अरे, प्रत्येक दुःखाला तू मला का पकडतो,
प्रश्न कर स्वतःला मी तुझ्यामध्येच राहतो.
अडचणींचंही असंच असतं ,
अवकाळी पावसासारख्या कधीही येतात,
काहींना दुःख, काहींना जगण्याचा मार्ग देऊन जातात…
– मुनांक
