असह्य झाला एकाकीपणा
छंद हा जपताना
नकळत गेले आयुष्य सारे
मीच मला शोधताना…
शोधता शोधता मी माझ्या
भूतकाळातच रमून गेलो
भविष्यकाळ तर सोडाच
स्वतःचं नावही मी विसरून गेलो…
विसरता स्वत्व मी माझे
भूतकाळ जागा होतो
स्तब्ध झालेल्या या मनाला
अलगद हुलकी ( हुलकावणी) देऊन जातो…
मग ठरवले मनाने
पुन्हा भूतकाळात रमणे नाही
पण मग विचार येतो मनात
आता कागद आणि लेखणीशिवाय
आयुष्यात उरले आहे का काही???
कागद आणि लेखणीशिवाय
आयुष्यात उरले आहे का काही????
– निवडुंग
