काही वेळा आयुष्यात अशा काही गोष्टी घडून जातात,
त्यांना सामोरं जाताना शहारे पण निष्क्रिय होतात आणि अश्रू ही साथ सोडतात,
शांतपणे चाललेलं हृदय अचानक त्याच्या सीमा पार करतं,
आणि स्नायूंनी साथ सोडल्याप्रमाणे शरीर मात्र निपचित पडलेलं असतं,
डोळ्यांसमोर स्वप्नं जात असतात आणि एकही क्षण हरवू नये म्हणून,
पापण्या ही मिटण्यास धजावत नसतात,
मग ती वेळ येते जेंव्हा हृदय काही वेळासाठी आराम करते,
आणि नजर मात्र सगळी साक्ष कैद करत भिर भिर फिरत असते
– मुनांक
