ए वेड्या… ए ए वेड्या..
तुला काय वाटलं ती अजून तुझ्याच गम मधी असंल?
अरे ती तिच्या फॅमिली सोबत
नायतर जीवलगासंगत छान वेळ घालवत असंल..
तू बस इथंच रडत तिची आठवन काढत
नायतर तिच्या नावाने खडे फोडत
पण आता ती काय तुझ्याकडं परत यायची नाय
उगा तेच तेच रडगानं गाऊन काय उपयोग काय?
त्यापरीस इसर ती गेलेली वेळ
अरे, तिला विसरायला सांगतंय कोन?
असं कर कायतरी आविष्यात
की एकदिवशी तिचाच येल तुला फोन..
काय मग लेका, पटतंय का हे?
पटत असंल तर लगेच करायला घे,
मार उडी, घे रिस्क या जीवनाच्या दर्यात,
कोन ना कोनतरी येलंच सोबतीला,
मग तुला रं कशाचं भे?
मग तुला रं कशाचं भे?
– शब्दार्थजीवन
(टीप – सदर कवितेतून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाहीये.
ज्यांनी प्रेमात आपला आत्मविश्वास गमावलाय किंवा गमावत आहेत त्यांच्यासाठी ही प्रेरणादायी कविता.)
