इलेक्शन आले, इलेक्शन झाले,
निवडून मात्र पुन्हा तेच आले…
इलेक्शन आले की यांना फ्रंट पेज पुरत नाहीत,
निवडून आले की हे पाच वर्षं दिसत नाहीत…
इलेक्शन आलं की गरिबाला पण करतात
नमस्कार साहेब, नमस्कार राव,
निवडून आले की, कसली आश्वासनं आणि कसले ठराव??…
बायकोच्या त्रासाला आमचे लोक दोन वर्षात कंटाळतात,
आणि देशाला लुटणाऱ्याला हेच लोक वर्षानूवर्षे निवडून देतात…
आवाज उठवला की देशद्रोही, शांत बसला की तुम्ही मुका PM होता,
मला काय कळतंय म्हणून तुम्ही विषयातूनच संन्यास घेता…
सत्तेच्या या जळुंनी शोषण केलंय देशाचं,
पोरानं ‘का’ म्हणून प्रश्न केला की बाप बोलतो,
“तू नको लक्ष देऊ. थोडीच जातंय आपल्या घरचं?”
शोषणाने यांच्या माणुसकीचे साठे संपून गेले,
म्हणून की काय आता, उरलेला चोथा खायला
चक्क जळूला सुद्धा दात आलेत…
