शब्द उमलावे, शब्द समजावे

शब्द उमलावे, शब्द समजावे,
शब्द ओठाओठांतून सहज फुलावे….

शब्द स्वच्छंदी, शब्द मस्तानी,
अगदी हळूवारपणे जपुन ठेवावे….

शब्द निरागस, शब्द अबोल,
इतकेच न समजावे …

शब्द कठोर, शब्द कणखर,
अगदी खोलवर रुजावे.
अगदी खोलवर रुजावे…..

– संजीवनी

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top