(आजची माझी ही कविता, माझ्या आयुष्यातून सुटलेल्या, तुटलेल्या व्यक्तींसाठी आहे. )
काही व्यक्ती आयुष्यातून स्वतःहून गेल्या, काही परिस्थितीमुळे,
काही काळाच्या ओघात सुटल्या, काही गैरसमजामुळे तुटल्या…
सुटलेल्यांना परत जोडण्याची हौस नाही,
तुटलेल्यांना परत जोडण्याचा मार्ग नाही.
काही व्यक्ती आयुष्यात नसल्याचं काही सोयरसुतक नाही,
काही व्यक्तींसाठी ते दुःख सरल्या सरत नाही.
काहींचं सुटलेल्याचं कारणही आठवत नाही,
काहींचं तुटलेल्याचं शल्य कायम बोचत आहे.
अशा सुटलेल्या गाठी आणि तुटलेली नाती घेऊन जगतो आहे,
तरी नवीन माणसे जोडतो आहे,
सुटणार आणि तुटणार असल्याची कल्पना असतानाही…
– शब्दार्थजीवन
