का कुणास ठाऊक असं घडतं…..
का कुणास ठाऊक असं घडतं ,
हसायला जातो मी आणि दुःखच पदरी पडतं ।।
प्रयत्न करतो मी नेहमी आनंदी राहण्याचा,
पण असा विचार केल्यानंतर,
काही क्षणातच भंगतो तो विचार माझा,
आणि परत असं वाटू लागतं की,
नशिबाने असा इरादाच केलाय का पक्का,
मला जास्त वेळ हसू न देण्याचा ?
जेव्हा मला राग येतो तेव्हा होतो तो खूप अनावर,
पण जेव्हा शुद्ध येते, तेव्हा परिणाम होतो माझ्या तना-मनावर ।।
लहानपणी प्रार्थना करायचो, देवा शांती असू दे गल्लोगल्ली,
पण पुस्तकात वाचलेलं आता खरंखुरं जाणवतंय, त्या व्यक्ती आणि वल्ली ।।
जाणकार लोक म्हणतात की जग बदलण्यासाठी,
आधी स्वतःमध्ये चांगले बदल करा,
पण स्वतः चांगलं वागूनही कल्पना-पुस्तकातल्या आणि,
प्रत्यक्षदर्शी माणसांच्या वर्तनातला फरक जाणवतोय खरा ।।
या चांगल्या-वाईटपणाच्या गुंत्यात अडकलोय मी खूप,
आणि कधी-कधी वाटतं मी नुसताच चाललोय,
या अंधारात, काळ्या गुडूप ।।
देव म्हणे बेस्ट ऍक्टरलाच संघर्षयुक्त रोल देतो,
पण मग हा संघर्ष करत असताना मला समजून घेण्याची बुद्धी,
इतरांकडून का हिरावून नेतो ??
नात्यांमध्ये जेव्हा वाद होतात तेव्हा कुणीतरी माघार घेऊन,
शांत राहिलं तर ते टिकतं,
पण प्रत्येकवेळी माघार घेऊनही का मला दाखवलं जातं,
की माझंच चुकतं ?
मान्य आहे की माझं पण चुकतं आणि चुकत असेल,
पण माझ्याही मनात विचारांचं वादळ उठलेलं नसेल ?
याच विचारांच्या वादळात मी भरकटतो, आंधळा होतो,
आणि समोर भेटेल त्यावर वाटेल तसं बरळतो ।।
याच वाईट खोडीने झालोय मी हैराण,
भीती वाटते की माझ्यासमोर राहू नये फक्त वैराण,
खूपवेळा सावध होऊन चालतो मी परतीची वाट,
पण येताना जसा असतो तसा नसतो उतार, लागतात मोठमोठे घाट ।।
भेटतात परत ते साथीदार, घाट पार करताना,
पण कोणी बोलतं मनापासून माफ करून,
तर कोणी बोलतं नाईलाज असताना ।।
मी ठरवलंय आता, चालत राहणार मी माझी वाट,
मग भलेही कितीही येवो असे अवघड घाट,
जर भल्या आणि खास माणसांची असेल साथ,
तो डरने कि क्या है बात !!! तो डरने की क्या है बात !!!….
– शब्दार्थजीवन
