शांत समुद्रकिनारा,
प्रेमाचा स्वच्छंदी वारा,
कोवळा जुना हात हातामध्ये,
सुंदर नातं आई-मुलीमध्ये,
बालपणीच्या सुखी जीवनाच्या कथा,
त्यातच आहे खूप मज्जा…
आला मधूनच एक राक्षस,
करण्या स्वच्छंदीपणाचा विध्वंस,
करून विध्वंस निघून गेला,
अन हातामधला हात सुटून गेला,
सैरभैर झाले जीवन आता,
मायेची सावली शोधताना,
मधूनच नवीन उमेद चेतना आली,
पण माऊलीची सावली मात्र हरपत गेली,
कोवळ्या मनाला कोवळा हात मिळाला,
अन प्रेमाच्या नात्याला पाझर फुटला,
पण जाण नाही कोवळ्या मनाला,
खरंच स्वच्छंदी हात मिळाला ना ?
उत्तर शोधता शोधता मनाला,
खूप कष्ट झाले शरीराला,
कोवळे मन असह्य झाले,
पुन्हा दुसऱ्या राक्षसाशी लढू लागले,
याही राक्षसाचा विजय झाला,
आता मात्र कोवळ्या मनाचा कोवळेपणाच हरपला,
मन अजूनही आहे कोवळे आतून,
पण राक्षसाने केले जर्जर बाहेरून,
कोवळ्या मनाच्या आले मनात,
आता करायचाच या राक्षसाशी दोन हात,
जेव्हा होईल त्या राक्षसाचा अंत,
तेव्हाच मिळेल डोईवर स्वच्छंदी मायाळू हात !!!!
– संजीवनी
