एक साथ…
नेहमी सोबत असणारी.
एक सुंदर जाणीव…
स्वतःलाच अधिकाधिक जाणून घेणारी.
एक निस्वार्थी भावना…
दुसऱ्यामध्ये पण स्वतःला बघण्याची.
एक विश्वास…
शेवटपर्यंत जपलेला.
एक स्वच्छंदीपणा…
निर्भीडपणे वावरणारा.
एक पोरकटपणा…
सारखा हट्ट करणारा.
एक पोक्तपणा…
हक्काने साथीदाराची काळजी घेणारा.
एक नातं…
कधी शांत तर कधी कठोरपणे जपता येणारं…
– संजीवनी
