आम्ही दोघे दोन टोकाचे
ती तिकडे आणि मी इकडे,
नाते आमुचे प्रेमाचे पण
इतरांना समजण्यापलीकडचे
तिचं शहर वेगळं
आणि माझं वेगळं शहर
तरीही आमच्या नात्याच्या वेलीला
येणार होता बहर
तिचं शहर धावपळीचं
माझं मस्त आरामात चालणारं..
तिचं कधीही न झोपणारं
तर माझं रात्री झोपुन
दुपारी जेवणानंतरही वामकुक्षी घेणारं
तिचे विचार वेगळे
आणि माझे होते वेगळे
तरीही आम्हाला एकमेकांचे
कळावयाचे सगळे
बोलणं वेगळं दोघांचंही
विचार पण सुरुवातीला नाही पटले,
पण नंतर एकमेकांचे स्वभावच आम्ही
अदलाबदल करून घेतले
ती वेगळ्या शहरातली
वेगळ्या शहरातला मी
शहरांच्या मोठेपणाची चढाओढ असली तरी
एक झालो आता आम्ही…
-शब्दार्थजीवन
