क्षणिक मेळा नजरेचा हा
हृदयात धडधड वाढवून गेला,
ती मनातच म्हणून गेली
असा काय बघतोय हा मेला???
😂 😂 😂 😂
अजून काही क्षण मिळता मग
नजरेच्या कोपऱ्यातून होऊ लागली शिवाशिवी
नयनांतूनच येरझारा घालू लागली
प्रेमाची ही टिटवी
🥰 🥰 🥰 🥰
रोज त्याच सिग्नलला होऊ लागली भेट,
तिच्याही काळजात मी घुसलो असावा थेट,
म्हणूनच तिने स्वतःहूनच विचारले कॉफीसाठी,
आणि उघडला तिच्या दिलाचा गेट
🤩 😍 🤩 😍
(कोरोनाच्या काळात)
मास्कच्या आडूनही कसा ओळखतो मी
हे तिला पडलेलं कोडं,
काय सांगू बाई तुला आणि कसं सांगू
तुला लाभली अशी मनमोहक नेत्रांची जोड
👁️ 👁️
तुझी निराळी टिकली आणि
त्यावर असलेलं कुंकू,
तुझी न दिसणारी हास्यछटा
मी आल्याचा आनंद लागते सांगू
😃 😇 😃 😇
त्या सिग्नल वर तू दिलास सिग्नल,
आणि पेटवलास माझ्या हृदयात
विझत चाललेला प्रेमाचा अनल,
अशीच माझ्या सोबती राहा
म्हणजे लवकरच आपला
लक्ष्मी-नारायणाचा जोडा बनंल…
👩❤️👨 👩❤️👨 👩❤️👨 👩❤️👨
– शब्दार्थजीवन
(टीप – सदर कविता पूर्णतः काल्पनिक आहे.
सिग्नलवर एक मनमोहक नेत्रांची जोड पाहिल्यावर सुचलेली थोडी विनोदी, थोडी प्रेमळ कविता..)
(अनल – अग्नी, आग)
