ShabdarthJeevan

भाषा माझी माऊली

आज काही भाषा दिन वगेरे नाही पण हल्ली असे ठरवले आहे मनात जे सुचेल ते लिहायचे. तसे लिहणे म्हटले की कागद पेनाची नितांत गरज पण जास्त काळ टिकवण्यासाठी आणि ती जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी हे डिजिटल माध्यम वापरावेसे वाटते. असो. आजचा विचार म्हणजे भाषा माझी माऊली. तसे म्हणायचे तर मी मराठी कोकणस्थ ब्राह्मण, म्हणजेच की मराठी […]

भाषा माझी माऊली Read More »

सकारात्मकता (छोट्या गोष्टीतली)

ठिकाण – पराठा स्पेशल हॉटेल वेळ – दुपार तो नुकताच हॉटेल मध्ये येऊन ऑर्डर देऊन ती येण्याची वाट पाहत बसला होता. थोड्या वेळाने ती आली. त्याची ऑर्डर. आलू पराठा. मोठ्या चवीने तो खाऊ लागला. पहिलाच घास घेऊन त्याने मान वर केली आणि त्याला खरी ती दिसली. नाकी डोळी सुंदर… छान टॉप काळ्या रंगाचा, त्यावर सफेद

सकारात्मकता (छोट्या गोष्टीतली) Read More »

येत नाहीस ती फक्त ‘तू’…

आठवण तर रोजच तुझी येते, येत नाहीस तर फक्त तू… इतक्या गोष्टी वाटून घेतल्या आपण, की प्रत्येक लहान गोष्टीत लक्षात येतो, तो तुझा संदर्भ… येत नाहीस तर फक्त तू… तू सोबत असताना दिवस काय रात्र काय, भुर्रर्रकन उडून जायचे, कळायचं पण नाही.. दिवस आताही येतात, रात्री आताही येतात, दिवस रखडत, तर रात्री रडत जातात, बऱ्याचदा

येत नाहीस ती फक्त ‘तू’… Read More »

कोपरा (मनाचा)

गावाला ना जुन्या घरांमध्ये एक कोपरा असायचा. त्याला गावाच्या भाषेत कोनाडा किंवा कोनवडा म्हणतात. त्यातला एक, पोरं आपल्यासाठी राखीव ठेवायचे. किमान आम्ही तरी. आणि त्यात आमच्या सगळ्या खेळण्याच्या वस्तू आणि जुन्या आठवणी असायच्या. माझ्याकडे माझ्या शाळेतल्या वह्या आहेत अजून. त्या घरातल्या एका कोपऱ्यातल्या कपाटात आहेत. लहान असताना जी पुस्तके वाचली गोष्टींची, ती सुद्धा आहेत त्यात.

कोपरा (मनाचा) Read More »

विरह…(आणि त्याची मजा)

विरह म्हणजे काय गं? जेव्हा दोन माणसं एकमेकांना भेटू शकत नाहीत, पण खूप, तीव्र आठवण येते तोच विरह ना? पण या विरहातही वेगळीच मजा असते, हे तुला पण पटतंच ना?… शेवटचं केव्हा भेटलो हे ना तुला आठवत, ना मला, पण त्या आठवणींमुळेच अजून एवढा तग धरून राहिलोय हे तर खरं ना? आता त्या आठवणी मनात

विरह…(आणि त्याची मजा) Read More »

एकमेवाद्वितीय आयुष्य

आपलं आयुष्य हे एकमेवाद्वितीय असतं, तसंच आपलं व्यक्तिमत्त्व ही असावं, जगाकडून बरंच काही चांगलं घ्यावं, पण आपण जगावेगळं असावं…   – शब्दार्थजीवन    

एकमेवाद्वितीय आयुष्य Read More »

ती अशी…

माझं मन, मेंदू, अंतरात्मा जे काही असतं, ते विसरलं नाहीये बहुधा तुला, कारण बऱ्याचदा अजूनही तू माझ्या स्वप्नात येतेस… मला तर वाटलेलं माझ्या इतक्या वर्षांच्या प्रतिक्षेचं फळ आहेस तू, पण स्वप्न अर्धवट राहिल्यावर जी कायम बोचत राहते ना, ती सल आहेस तू…. तुझे नयन कटाक्ष जशी तू मृगनयनीच, तुझी कांती जणू सुवर्णमृगीची… तुझी वाणी मधूपक्व

ती अशी… Read More »

भांडण (- आईसोबतचं )

घरात भांडी असली तर भांड्याला भांडं लागणारच हा वाक्प्रचार हल्ली खूपच प्रमाणात आढळतो आहे, नाही ? आणि या भांडणाला वेगवेगळी रूपं, ठिकाणं, कारणं असतात. त्यात समाविष्ट व्यक्ती वेगवेगळ्या स्तरातल्या असतात. जसं सिग्नलवर होणारी, रस्त्यात कोणी गाडीला धक्का मारला म्हणून होणारी, नवरा बायको मधली, सासू-सुनेमधली, संपत्तीच्या वाट्यावरून भावा-भावात होणारी आणि अजून कित्येक नात्यांमध्ये तसेच अनोळखी लोकांसोबत

भांडण (- आईसोबतचं ) Read More »

मायेचा हात

शांत समुद्रकिनारा, प्रेमाचा स्वच्छंदी वारा, कोवळा जुना हात हातामध्ये, सुंदर नातं आई-मुलीमध्ये, बालपणीच्या सुखी जीवनाच्या कथा, त्यातच आहे खूप मज्जा… आला मधूनच एक राक्षस, करण्या स्वच्छंदीपणाचा विध्वंस, करून विध्वंस निघून गेला, अन हातामधला हात सुटून गेला, सैरभैर झाले जीवन आता, मायेची सावली शोधताना, मधूनच नवीन उमेद चेतना आली, पण माऊलीची सावली मात्र हरपत गेली, कोवळ्या

मायेचा हात Read More »

गुरु

ज्याने जीवनाचा कठीण असा महासागर पार केला आहे, आणि जो निस्वार्थ भावनेने इतरांनाही तो पार करायला मदत करतो तो खरा गुरु –  स्वामी विवेकानंद गुरु !!! गुरु हा संस्कृत शब्द, ज्याचा अर्थ आहे – असा शिक्षक जो आपल्या शिष्यांचे अज्ञान घालवून त्यांना सुमार्ग दाखवतो तो. हा दिवस गुरु पौर्णिमा म्हणून साजरी करतात कारण या दिवशी

गुरु Read More »

Scroll to Top