Blogs

Your blog category

राजगड – गिर्यारोहणाचं प्रवासवर्णन

वेळ सकाळी ९:४५. पावसाची रिपरिप आणि मध्येच सडकून लागणारी सर. तांबड्या मातीतून चिखलातून घसरत घसरत झालेली सुरुवात. काही ओळखीचे मित्र असते तर इथूनच परत गेले असते, त्यामुळे त्यांना आणलंच नाही ते बरं झालं, अशी भावना. पहिल्या थांब्यानंतर चोरदरवाजाजवळ एकच माणूस जाईल अशा अवघड आणि उभ्या सरळसोट वाटेवर झालेली कोंडी आणि गिर्यारोहकांच्या त्याबद्दल निघणाऱ्या संमिश्र भावना. […]

राजगड – गिर्यारोहणाचं प्रवासवर्णन Read More »

माझी सिंहगड वारी

नमस्कार मित्रहो आणि मैत्रिणींनो,  आताच सिंहगड ट्रेकिंग करून आलो आणि मला त्यातल्या गंमतीजंमती टिपून ठेवायच्यात. त्याच तुमच्यासोबत सुद्धा share करणारे. आता अंघोळीसाठी पाणी गरम होईपर्यंत लिहितो म्हणजे विसरणार नाही. कारण या आधीची बरीच प्रवासवर्णनं नंतर लिहेन या कारणामुळे काळाच्या ओघात मेंदूतून नष्ट झाली.  सुरुवात –  तर काल रात्री उशीरपर्यंत ऑफिसचं काम चालू होतं. त्यामुळे झोपायला

माझी सिंहगड वारी Read More »

माझं घर

सन २००० मध्ये जालगांवमधील श्रीरामनगर (दापोली) या भागात तयार झालेलं माझं हे घर, आज २० वर्षं होऊनही दिमाखात उभं आहे. हो ! दिमाखातच म्हणतो आहे. तो इतरांसाठी राजवाडा नसला तरी आमच्यासाठी नक्कीच आहे. ज्यांचं स्वतःचं घर नाहीये, त्यांच्यासाठी त्यांची भाड्याने घेतलेली खोली किंवा माळावर असलेली चंद्रमौळी झोपडी हाच राजवाडा किंवा बंगला असतो. तसा हाही आमचा

माझं घर Read More »

।। लॉकडाऊन ते लेक-अप ।।

आज लॉकडाऊन या पद्धतीने जगण्याला १ आठवडा झाला. आपण त्याला सरावलो, चिडलो, हैराण झालो अश्या अनेक प्रतिक्रिया समोर आल्या. कोणत्याही भावनेने असो, पण जीव वाचवण्याच्या भीतीने आपण त्याला स्वीकारले आणि अजून पुढील काही दिवस स्वीकारणार. ह्या आठ दिवसात घरातील “ती” च्यासाठी अनेक कौतुक-उद्गार निघाले, टाळ्या आल्या. पण खरी कथा आता सुरु होणार. तसं बघितलं तर

।। लॉकडाऊन ते लेक-अप ।। Read More »

कोरोना आणि उपासना

सध्या करोना मुळे जवळजवळ सर्वच ठिकाणी परीक्षा रद्द झाल्या आहेत. ज्यांना पुढील अगत्याच्या वर्गात जायचे आहे त्यांच्या परीक्षा कदाचित उशिरा तरी घेतल्या जातील किंवा मागील चाचण्यांवरून त्यांचे प्रगती पत्र तयार केले जाईल. जे विद्यार्थी प्रथम दिनापासून सजग आहेत, योग्य अभ्यास करीत आहेत त्यांना काही चिंता नाही, कारण त्यांचे चाचण्यांचे मार्क सुद्धा उत्तम आहेत. असेच काहीसे

कोरोना आणि उपासना Read More »

देह वस्त्र

सध्या एका व्यापाऱ्यांनी देवाची वस्त्रे शिवण्याचं काम दिले आहे. त्यासाठी घरातील व मैत्रिणीकडील कापडाचे वेडेवाकडे तुकडे जमा केले. त्याला व्यवस्थित आकारात कापले, अस्तर लावले, शिवण घातली, सोनेरी काठ लावले व शेवटी बंद म्हणून चेन किंवा हुक व बटणं लावून हे वस्त्र तयार झाले. हे करता करता काही सुचले म्हणून लिहले – पंचमहाभूतांमधून देवाने कैक विभूती

देह वस्त्र Read More »

भाषा माझी माऊली

आज काही भाषा दिन वगेरे नाही पण हल्ली असे ठरवले आहे मनात जे सुचेल ते लिहायचे. तसे लिहणे म्हटले की कागद पेनाची नितांत गरज पण जास्त काळ टिकवण्यासाठी आणि ती जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी हे डिजिटल माध्यम वापरावेसे वाटते. असो. आजचा विचार म्हणजे भाषा माझी माऊली. तसे म्हणायचे तर मी मराठी कोकणस्थ ब्राह्मण, म्हणजेच की मराठी

भाषा माझी माऊली Read More »

सकारात्मकता (छोट्या गोष्टीतली)

ठिकाण – पराठा स्पेशल हॉटेल वेळ – दुपार तो नुकताच हॉटेल मध्ये येऊन ऑर्डर देऊन ती येण्याची वाट पाहत बसला होता. थोड्या वेळाने ती आली. त्याची ऑर्डर. आलू पराठा. मोठ्या चवीने तो खाऊ लागला. पहिलाच घास घेऊन त्याने मान वर केली आणि त्याला खरी ती दिसली. नाकी डोळी सुंदर… छान टॉप काळ्या रंगाचा, त्यावर सफेद

सकारात्मकता (छोट्या गोष्टीतली) Read More »

कोपरा (मनाचा)

गावाला ना जुन्या घरांमध्ये एक कोपरा असायचा. त्याला गावाच्या भाषेत कोनाडा किंवा कोनवडा म्हणतात. त्यातला एक, पोरं आपल्यासाठी राखीव ठेवायचे. किमान आम्ही तरी. आणि त्यात आमच्या सगळ्या खेळण्याच्या वस्तू आणि जुन्या आठवणी असायच्या. माझ्याकडे माझ्या शाळेतल्या वह्या आहेत अजून. त्या घरातल्या एका कोपऱ्यातल्या कपाटात आहेत. लहान असताना जी पुस्तके वाचली गोष्टींची, ती सुद्धा आहेत त्यात.

कोपरा (मनाचा) Read More »

भांडण (- आईसोबतचं )

घरात भांडी असली तर भांड्याला भांडं लागणारच हा वाक्प्रचार हल्ली खूपच प्रमाणात आढळतो आहे, नाही ? आणि या भांडणाला वेगवेगळी रूपं, ठिकाणं, कारणं असतात. त्यात समाविष्ट व्यक्ती वेगवेगळ्या स्तरातल्या असतात. जसं सिग्नलवर होणारी, रस्त्यात कोणी गाडीला धक्का मारला म्हणून होणारी, नवरा बायको मधली, सासू-सुनेमधली, संपत्तीच्या वाट्यावरून भावा-भावात होणारी आणि अजून कित्येक नात्यांमध्ये तसेच अनोळखी लोकांसोबत

भांडण (- आईसोबतचं ) Read More »

Scroll to Top